लंडन :- भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाटकड याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली आहे. त्याने ससेक्सकडून खेळताना लिस्टरशायरविरुद्धच्या लढतीत तब्बल 9 गडी बाद केले व संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
ससेक्स संघाने लिस्टरशायरसमोर विजयासाठी 499 धावांचे आव्हान ठेवले होते. लिस्टरशायरने 6 बाद 450 धावा केल्या होत्या. त्यानंतर उनाडकटने सामन्याचे चित्रच पालटवून टाकले.
त्याने पहिल्या डावात 12.4 षटकांत 23 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले होते, तर दुसऱ्या डावात 32.4 षटकांत 94 धावा देताना 6 गडी बाद केले व ससेक्स संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला.