ढाका – भारतीय संघाने बांगलादेशला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी क्लीन स्वीप दिली. एकदिवसीय मालिकेत पत्करावा लागलेल्या पराभवाचा टीम इंडियाने बदला घेतला. बांगलादेशचा दौरा भारतासाठी खूपच सोपा राहील असे वाटत होते, मात्र या दौऱ्यात बांगलादेशने भारताला चांगलेच आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. पहिला कसोटी सामना भारताने १८८ धावा राखून जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या सावध फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या सामन्यात ३ गडी राखून बाजी मारली.
#INDvsBAN । कुलदीपला बाहेर ठेवल्याबद्दल केएल राहुलचं मोठं वक्तव्य; म्हणाला,”मला पश्चाताप…”
महत्वाचं म्हणजे, या कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेटसाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या. कारण २२ महिन्यानंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने पहिल्या सामन्यात ८ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटला संघात स्थान देण्यात आले. त्याने तब्बल १२ वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. दुसऱ्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करता त्याने २ गडी बाद करण्यात यश मिळवले. उनाडकटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरेच क्रिकेट खेळले आहे.
#INDvsBAN । सामन्यात OUT करणाऱ्या गोलंदाजाला विराटने स्वतःची जर्सी भेट दिली
दरम्यान, भारतीय संघाने रविवारी कसोटी मालिका जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी ऋषभ पंतने असे काही केले की सध्या त्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी कर्णधार केएल राहुलाने चषक आणला आणि खेळाडूंकडे दिला. तेव्हा तो चषक हातात घेऊन सेलिब्रेशन करण्यासाठी ऋषभ पंतने जयदेव उनाडकटला मध्ये उभा राहण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यानंतर उनाडकट एका कडेला उभा राहिलेल्या जागेवरून मध्यभागी गेला. पंतच्या याच वर्तनाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
#BCCI #TeamIndia #RishabhPant #BanvsInd
Nice Gesture Of Rishabh Pant Towards Jaydev Unadkat Who Is Coming Back In International Cricket After 12 Years.
Rishabh Pant Ask Jaydev Unadkat To Lift The Trophy 🏆. pic.twitter.com/YW7oJWgQmv
— Duck (@DuckInCricket) December 25, 2022
तसे पहिले तर, एखादी मालिका जिंकल्यानंतर विजयाचा चषक हातात घेऊन सेलिब्रेशन करण्यासाठी संघातील नवख्या खेळाडूला संधी दिली जाते. त्यामुळे यावेळीही राहुलने एका अनकॅप्ड खेळाडूला ही संधी दिली. त्यानंतर उनाडकटने हा चषक उंचावत विजयाचा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.