अमेरिका म्हणते रशियाला मी भारी,
चीन म्हणतो अमेरिकेला मी तुमच्याहून भारी,
जपान म्हणतो चीनला मी तर सगळ्यांहून भारी,
पण एक जंतू म्हणतो सगळ्यांना
तुम्ही असाल कितीही भारी,
मिच आहे तुमचा सर्वनाशकारी..
भारत म्हणतो बरे झालं, मी तटस्थ होतो
किमान वेळेआधी सावध झालो
पण, स्पेन अन् इटली म्हणते
आम्ही फुकटच् मेलो.
आता, औषध काढायला यांच्याच कंपन्या सरसावल्या
घेतला त्यांजकडून उक्ताच ठेका..
वाटते जणू कोंबडी अन् पिलांना निर्दयतेने
खाऊन टाकील बोका…
वैज्ञानिकांनो तुमच्यात नाही का कुणी लुईस पार्चर..
आजपर्यंत नुसता ट्रेलरच दाखविता
कधी दाखविता खरा पिच्चर..
आमच्या सारखे तुम्ही हो
आईनस्टाईन, न्यूटनला नाही ना केले देव?
अन् कर्तव्य करायचे सोडून नाहीना
फोडला नुसताच पुजेचा पेव?
तुमच्या सगळ्यांच्या अमानवी कृत्याने
आवळला माणुसकीलाच फास?
आता मनुष्याने धरावी तर धरावी कुणाकडून ती आस?
अजूनही जागे व्हा का करता उगीच पेला अर्धा
माणुस म्हणून जगा की कधीतरी,
का करता निष्कारण जीवघेणी स्पर्धा…
– राजेंद्र पोपटराव आंधळे (कामरगांव, ता नगर)
संपर्क: 9822875802