अहमदाबाद – गुजरात मध्ये एका घरात गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट होऊन त्यात सात जण मरण पावल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्षात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याची ही घटना मंगळावारी रात्री घडली. त्या खोलीत काही मजुर आणि त्यांचे कुटुंबिय राहात होते. त्यावेळी घरातील जे लोक जखमी झाले त्यातील सात जण गेल्या दोन दिवसांत उपचार सुरू असताना मरण पावले.
मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. त्या घरातील कुटुंबिय झोपलेले असताना स्फोटाचा प्रकार घडला. घरातील सिलींडर मध्ये गळती होत असल्याची बाब शेजारच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घरातील लोकांना जागे करण्यासाठी त्यांचा दरवाजा खटखटला. त्यानंतर घरातील लोक जागे झाल्यानंतर त्यांनी काय झाले हे पाहाण्यासाठी लाईट लावली त्यावेळी घरात कोंडलेल्या गॅसचा हा स्फोट झाला. ही घटना घडली त्यावेळी घरात एकूण दहा जण झोपलेले होते. अन्य तीन जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.