नवी दिल्ली – देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड व भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या दोन करोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन वापरासाठीची परवानगी रविवारी देण्यात आली. लसींना परवानगी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष लसीकरण कधीपासून सुरु होणार? प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसी कधीपर्यंत उपलब्ध होणार? याबाबतचे विविध अंदाज बांधण्यात येत होते.
मात्र आता सरकारतर्फे प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसी कधीपर्यंत उपलब्ध होणार याबाबतची माहिती देण्यात आली असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ( corona vaccination in India )
सरकारने आज करोना लसीकरणाबाबत माहिती देताना. ‘आपत्कालीन परवानगी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरु होईल’ असं सांगण्यात आलंय. अर्थातच याबाबतचा पुढील निर्णय ‘ड्राय-रन’मधून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारावर घेण्यात येईल.
दरम्यान, देशामध्ये करोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आज नव्या २० रुग्णांची भर पडल्याने आता ही संख्या ५८वर जाऊन पोहचली आहे. ७० टक्के अधिक संसर्गजन्य असलेल्या नव्या विषाणूचे रुग्ण वाढल्याने देशामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज सरकारने प्रत्यक्ष लसीकरण १० दिवसांमध्ये सुरु होईल अशी माहिती दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. ( corona vaccination in India )
तत्पूर्वी, सीरम इन्स्टिट्यूटने आपल्याकडे ५ कोटी लसींचे डोस वितरणासाठी तयार असल्याची माहिती दिली आहे.
We are prepared to roll out vaccine within 10 days of emergency use authorisation approvals. The final call will be taken by the government: Union Health Secretary Rajesh Bhushan
DGCI gave approval to two vaccines on January 3 pic.twitter.com/g6sWMsX4cG
— ANI (@ANI) January 5, 2021