पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील श्रेणी सुधार परीक्षा दि. 11 ते 23 जानेवारी या कालवधीत ऑनलाइन होणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये आयोजित कला, विज्ञान, वाणिज्य, फार्मसी, विधी आदी अभ्यासक्रमांची पदवी पूर्ण केलेल्या श्रेणीसुधार तसेच बीए, बीएस्सी अन्य परीक्षांसाठी अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
या परीक्षांसाठी जवळपास 260 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.