सांगली(प्रतिनिधी)- वाळवा तालुक्यातीलकुंडलवाडी येथे मुंबईहून आलेला ३० वर्षीय तरुणाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४७ वर पोहचली आहे.
येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याची तपासणी करण्यात आली होती. लक्षणे करोनासदृश्य असल्याने मिरज सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविण्यात आले होते. या तरूणाचा काल स्त्राव घेण्यात आला होता . त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
या तरुणाचे संपर्कातील लोकांचा शोध सुरू असून अनुषंगिक उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.