नवी दिल्ली – देशातील करोना बाधितांची रुग्ण संख्या आता आणखी आटोक्यात येऊ लागली असून गेल्या 24 तासात देशात 60 हजार 753 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत.
आजचा हा आकडा गेल्या 74 दिवसांतील नीचांकी आकडा आहे. दरम्यान आज मृतांच्या संख्येतही बऱ्यापैकी घट झाली असून गेल्या 24 तासांत देशात 1647 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 3 लाख 85 हजार 137 इतकी झाली आहे.
देशातील राष्ट्रीय कोविड रिकव्हरी रेट आता 96.16 टक्क्यांवर पोहचला आहे. काल दिवसभरात देशात एकूण 19 लाख 2 हजार 9 कोविड चाचण्या घेतल्या गेल्या. देशाचा दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 2.98 टक्क्यांवर आला आहे.