गढवा – सध्याची लॉकडाऊनची स्थिती आणि करोनाची भीती यामुळे जोडप्यांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी भेटण्यांवर जोडप्यांची तयारी असते. मात्र लपून छपून धोकादायक ठिकाणी भेटणं एका जोडप्याला चांगलाच महागात पडल आहे.
येथील महिलेला एका पुरुषसोबत धोकादायक जागेवर अनैतिक शारिरीक संबंध अर्थात सेक्स करणं जीवघेणं ठरल असून दुर्घटनेत महिलेच्या प्रियकराला आपला जीव गमवावा लागला. तर तरुणीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. हे दोघे घरच्यांची नजर चूकवून एका जीर्ण झालेल्या घरात सेक्स करत होते. मृत पुरुषाला तीन मुलं आहेत. तर महिलेला तिच्या नवऱ्याने सोडलेलं आहे.
दरम्यान मुसळधार पावसामुळे घर जीर्ण झाल होतं. दोघं सेक्स करत असताना घराचं छत अचानक कोसळलं. त्याखाली दबून प्रियकर जागीच ठार झाला. ही घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील करकोमा गावातील आहे.
करकोमा गावात दशरथ भुईया यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नासाठी सिरहे गावातील महिला गावात दाखल झाली होती. शुक्रवारी रात्री लग्नाची वरात निघाली. या वरातीसोबत महिलेचं संपूर्ण कुटुंब गेलं होतं. याचा फायदा घेत तरुणीने आपला प्रियकर सुरेंद्र मेहता याला बोलवून घेतलं. दोघ घरापासून काही अंतरावर मोडकळीस आलेल्या एका घरात भेटले.
दोघांनी सेक्स करण्यास सुरुवात करताच पावसामुळे घराचं स्लॅब कोसळलं. दोघेही या स्लॅबखाली दबले. जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्यामुळे मदतीला लोक आले. महिलेला तातडीने बाहेर काढण्यात आलं. तर पोलिसांच्या मदतीने प्रियकराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.