चंद्रपूर- चंद्रपूर शहरात एका कोरोना संशयिताची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह एकत्र येणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रिडा विषयक प्रदर्शने, शिबीरे, मेळावे, जत्रा, यात्रा हे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, विदर्भात यवतमाळ, नागपूरनंतर आता चंद्रपूरातही कोरोना विषाणू संशयित आढळल्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.