कराची – इंग्लंडच्या अलेक्स हेल्सला कोरोना झाल्याची अफवा पसरली होती, त्यामुळे पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेल्या 128 क्रिकेटपटूंची करोना चाचणी घेण्यात आली होती, त्याचा अहवाल गुरूवारी आला असून या चाचणीत सर्व निगेटिव्ह ठरले असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे आता ही लीग रद्दही करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तान सुपर लिगमध्ये सहभागी झालेला इंग्लंडचा अष्टपैलू अलेक्स हेल्स याला करोनाची लागण झाल्याचे माजी कसोटीपटू रमिझ राजा याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र, खुद्द हेल्सने राजासह पाकिस्तान क्रिकेट मंडळाला फटकारले असून कोणतीही माहिती न घेता विनाकारण मला करोनाची लागण झाल्याचे जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.