मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ‘करोना व्हायरस’चा वाढता प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्वप्रकारची सार्वजनिक स्थळं, शाळा- कॉलेज आणि चित्रपट, मालिकांचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे.
दरम्यान, या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार पुढे सरसावले आहेत. नुकतंच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
T 3476 – T 3476 – -The film fraternity pleads and cautions for safety and precaution .. on CoVid 19 .. an initiative by the Industry and the CM Maharashtra pic.twitter.com/xjZsBI2diu
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 20, 2020
या व्हिडिओमध्ये, अनेक कलाकारांनी ‘करोना’ सारख्या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्याचे खास सल्ले दिले आहेत.