दिवे -करोनामुळे दिवे, सोनोरी (ता. पुरंदर) परिसरात नागपंचमी हा सण घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. सोनोरी परिसरातील राहणाऱ्या पूनम शिंदे, अर्चना शिंदे, मनिषा शिंदे, यांनी घराशेजारीच वारूळ पूजन केले.
तर दिवे परिसरात सुद्धा यावर्षी झिम्मा फुगडी, पिंगा, फेरावरची गाणी, झोका असे दरवर्षी होणारे कोणतेही खेळ झाले नाहीत, अशी माहिती रूपाली झेंडे, सविता झेंडे, अर्चना झेंडे, दिव्या झेंडे, छाया गायकवाड यांनी दिली.