राहुल यांनी अध्यक्षपदी राहावे यासाठी आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली – निवडणुकीत कॉंग्रेसच्या झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. तर त्यांचा हा निर्णय बदलावा व तेच कॉंग्रेस अध्यक्षपदावर कायम राहावेत, यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. याच मागणीसाठी कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार कॉंग्रेस मुख्यालयाबाहेरच घडला. या ठिकाणी एक कार्यकर्ता मुख्यालयाबाहेर आला व झाडाला स्वतःला लटकावून घेऊ लागला. हा प्रकार पाहून आसपासच्या काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले. कार्यकर्त्याने म्हटले आह की, जर राहुल गांधी राजीनामा परत घेणार नसतील तर मी या ठिकाणीच आत्महत्या करेन.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.