नवी दिल्ली : दिल्ली कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार वालिया यांचे निधन झाले. त्यांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात वालिया यांनी अखेरचा श्वास घेतला. ते करोना विषाणूविरुद्ध तीन दिवस लढत होते.
डॉ. अशोक कुमार वालिया हे सलग 4 वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी शीला दीक्षित यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी आरोग्य, नगरविकास, जमीन आणि बांधकाम विभाग यांचा कार्यभार सांभाळला होता.