नवी दिल्ली – सपने जागावाटपाच्या प्रस्तावाची माहिती दिल्यानंतर कॉंग्रेसने उत्तरप्रदेशविषयीचा संभ्रम वाढवला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना पत्रकारांनी उत्तरप्रदेशबाबत प्रश्न विचारला. कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या थेट संपर्कात आहेत.
दोन्ही पक्षांत सकारात्मक चर्चा सुरू आहे. जागावाटपाचे सुत्र निश्चित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येईल, असे उत्तर त्यांनी दिले. जागावाटप निश्चित झाले नाही का, असे विचारल्यावर त्यांनी उत्तरादाखल अंतिम जागावाटप निश्चित झाल्यावरच अंतिम होईल, असे म्हटले.