पिंपरी – तरुणी राहत असलेल्या हॉस्टेलवर जाऊन तरुणाने गोंधळ घातला. तसेच तिचा पाठलाग करून, रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार पिंपरी परिसरात 31 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत घडला.
सुनील अशोक कोलते (वय 23, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी पिंपरी परिसरात हॉस्टेलवर राहते. तरुणी फोन करत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिच्या हॉस्टेलवर गेला आणि तिथे गोंधळ घातला. तरुणीला शिवीगाळ करून तिच्या गाडीचा पाठलाग केला. सार्वजनिक रस्त्यात गाठून तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला.