पुणे – भारतातील पहिल्या सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या महिला संचालकांच्या पहिल्या सर्टिफिकेट कोर्सच्या पहिल्या बॅचचा प्रारंभ डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील (डायरेक्टर सीआयआरटी पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
सीआयआरटी पुणे येथे आज महाराष्ट्र राज्यातील सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल महिला संचालकांकरिता भारत सरकारचा पहिला सर्टिफिकेट कोर्सच्या पहिल्या बॅचने आज (15 फेब्रुवारी) प्रशिक्षण घेतले. हा प्रशिक्षण कोर्स दिनांक 15, 16 व 17 फेब्रुवारी 2021 असा तीन दिवसाचा कोर्स आहे. या कोर्ससाठी महाराष्ट्रातून 30 महिला सरकार मान्य ड्रायव्हिंगच्या संचालिका उपस्थित होत्या.
यावेळी सीआयआरटी शेखर ढोले परिवहन आयुक्त कार्यालयाचे रस्ता सुरक्षा विभागाचे अनिल वळीव (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी) उपस्थित होते. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. ते संजय ससाणे (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी), अर्चना स्वामी (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी), पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार, राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन अध्यक्ष राजू घाटोळे, सीआयआरटी ट्रेनिंग विभागाचे प्रमुख प्रशांत काकडे, रस्ता सुरक्षा विषयाचे अभ्यासक अनिल पंतोजी, राज्याच्या महिला विभागाच्या प्रतिनिधी महानंदा पन्हाळे, पुष्पक किवडकर, सुनिता चौहान, शितल कोठारी आदी महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
राज्यातील व देशातील सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांना प्रगत तंत्रज्ञानानुसार अपग्रेड करून त्यांचा दर्जा सुधारून उत्कृष्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूल होतील .यासाठी राज्यातील सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ऑडिट परिवहन आयुक्त व सीआयआरटी पुणे यांच्यामार्फत केले जाईल. तसेच महाराष्ट्रात अतिशय उच्च प्रतीच्या कुशल वाहन चालक निर्माण करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल संस्था अद्ययावत कशा होतील हि आमची धारणा आहे. त्यातूनच मोटर ड्रायव्हींग स्कूलचे ग्रेडेशन सुद्धा केले जाईल, असे डॉ. कॅप्टन राजेंद्र सनेर पाटील (डायरेक्टर सी आ य आर टी ) यांनी सांगितले.
राज्यातील सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या 20 ट्रेनिंग बॅचेस आम्ही सीआयआरटीच्या माध्यमातून करू असे राज्य मोटर ड्राइविंग स्कूल चे अध्यक्ष राजू घाटोळे म्हणाले. सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलला या सर्टिफिकेट कोर्स मध्ये संपूर्ण सहकार्य सीआयआरटी च्या माध्यमातून केले असे शेखर ढोले यांनी सांगितले.
यावेळी राज्य रस्ता सुरक्षा विभागाचे निरीक्षक म्हणून अनिल वळीव (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शाहिद जमादार, संजय पाटील (मोटर वाहन निरीक्षक पुण) उपस्थित होते.प्रास्ताविक प्रशांत काकडे यांनी केले