साडीमध्ये मी कम्फर्टेबल

मुंबई – साडी हा महिलांचा आवडता पोषाख असला तरी पुरुष वर्गाला मात्र महिला साडीत कशा वावरत असतील, असा प्रश्न पडत असतो. मात्र अभिनेता अक्षय कुमार याने मात्र साडीत काम करताना त्याला बिलकूलच त्रास झाला नाही असा खुलासा केला आहे. साडीला अभिनेता अक्षय कुमारने ‘कम्फर्टेबल’ असा टॅग दिला आहे.


अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये साडी नेसली आहे. अक्षय नेहमी त्याच्या चाहत्यांना चित्रपटातून काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात तो एका तृतीयपंथीयाच्या भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक समोर आल्यानंतर तो प्रचंड हिट झाला होता. याविषयी अक्षयने सांगितले, ‘मला नेहमी आव्हान स्विकारायला आवडते. मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी सर्वात कठिण भूमिका लक्ष्मीची आहे. पण मनापासून मला हे पात्र करायचं होतं.


या चित्रपटात मी साडी नेसून आहे. मात्र साडीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होते. मला साडीत शूटींग करताना जराही त्रास झाला नाही. मला आवडतात अशा विचित्र गोष्टी करायला. मात्र त्या भूमिकेसाठी योग्य हावभाव चेहऱ्यावर आणने हे माझ्यासाठी कठिण होतं.’ असं अक्षय म्हणाला.


राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच तुषार कपूर, शरद केळकर आणि कियारा अडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.