दिलासादायक! कोरोनाचे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांवर

 

नवी दिल्ली-देशात गुरूवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 20 हजार 903 नवे करोनाबाधित आढळले. तो आजवरचा उच्चांक ठरला. त्याशिवाय, एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त होण्याची दिलासादायक घडामोडही घडली.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी 6 लाखांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर पुढच्याच दिवशी नव्या बाधित संख्येचा नवा विक्रम नोंदला गेला. महाराष्ट्र, तामीळनाडू, दिल्ली, तेलंगण आणि कर्नाटकमधीलवाढती संख्या त्यासाठी कारणीभूत ठरली. महाराष्ट्रात बाधित आणि बळींची संख्या देशात सर्वांधिक आहे.

तामीळनाडूनेही बाधित संख्येत 1 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर दिल्लीची वाटचाल तो टप्पा गाठण्याच्या दिशेने सुरू आहे. गुजरातमध्ये 34 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. करोना संसर्गामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्या बाधितांची संख्या याआधीच 18 हजारांवर गेली आहे. बळींच्या संख्येत महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत सुमारे 2 हजार 900 बाधित दगावले आहेत. तर गुजरातमधील मृतांची संख्या 1 हजार 900 च्या घरात आहे.

बाधित आणि बळींची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय भर पडत असल्याची बाब आशादायी ठरत आहे. देशात एकाच दिवसात 20 हजार 33 बाधित करोनामुक्त झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 2 लाख 27 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 3 लाख 80 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. देशात बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण 60.73 टक्‍क्‍यांवर पोहचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.