वॉशिंग्टन – अमेरिकेतील वैज्ञानिकांनी सर्वात शुभ्र असा पांढरा रंग तयार केला असून हा रंग ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी परिणामकारक ठरणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
या रंगावरून 95 टक्के पेक्षा जास्त टक्के सूर्यकिरणे परावर्तित होतात त्यामुळे रंगाचा वापर केलेल्या खोलीत वातावरण कमी तप्त राहते असे या संशोधकांनी म्हटले आहे रंगाच्या या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे या रंगाचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे.
इमारतीचे छत आणि त्याच्या बाजूच्या भिंतींना हा रंग जर लावण्यात आला तर या इमारतीतील वातावरण थंड राहू शकते असाही दावा या संशोधकांनी केला आहे या संशोधनाप्रमाणे कोणत्याही इमारतीच्या छतावर सूर्याची सर्वात जास्त किरणे पडतात ही किरणे जेवढ्या जास्त प्रमाणात परावर्तीत होतील तेवढ्या प्रमाणात या इमारतीचे वातावरण थंड राहू शकते अशा प्रकारचा रंग जर इमारतीच्या छतावर दिला तर सूर्याच्या किरणांचे परावर्तनाचे प्रमाण वाढून आतील वातावरण थंड राहू शकते.
हा रंगाचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला तर वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचीही गरज भासणार नाही असेही या संशोधकांनी म्हटले आहे. एसी यंत्रणेतून बाहेर पडणाऱ्या वायूचा मोठ्याप्रमाणावर हवेचे प्रदूषण होण्यात हातभार लागत असतो त्यामुळे वातानुकुलीत यंत्रणा ऐवजी या या रंगाचा वापर झाला तर हवा प्रदूषण नियंत्रित राहणार आहे.
या रंगाच्या उत्पादनामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रंग तयार करण्यासाठी खर्चही अतिशय कमी येणार असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. इतर रंगांच्या तुलनेत हा रंग जास्त टिकाऊ असल्यामुळे उंच इमारती किंवा मोटारी यांच्या रंगाचे काम करण्यासाठी सुद्धा या रंगाचा वापर करता येऊ शकेल याचा वापर केल्यामुळे खोलीचे तापमान 18 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते त्यामुळेच थंडीच्या मोसमामध्ये या रंगाचा होऊन वातावरण अधिक थंड होण्याचा धोकाही आहे.