“जे 70 वर्षात झाले नाही, ते नरेंद्र मोदींनी 7 वर्षात केले”, एलपीजी गॅस दरवाढीवरून आपचा भाजपवर हल्ला

नवी दिल्ली – एलपीजीपाठोपाठ आता घरगुती सिलिंडरच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केंद्र सरकारवर टीका करताना लिहिले आहे की, जे 70 वर्षांत झाले नाही ते नरेंद्र मोदींनी 7 वर्षांत करून दाखवले. आपच्या या ट्विटवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
LPG Gas की क़ीमत 70 साल में ₹400 तक पहुंची थी, वो अब ₹1000 में मिल रही है।
तो मित्रों बताओ, जो 70 साल में नहीं हुआ वो Modi ने 7 साल में किया कि नहीं किया?#LPGPriceHike pic.twitter.com/bhVtsaKB8k
— AAP (@AamAadmiParty) May 7, 2022
आम आदमी पार्टीचे ट्विट –
‘आप’ने लिहिले होते की, “LPG गॅसची किंमत 70 वर्षांत 400 रुपयांवर पोहोचली होती, ते आता 1000 रुपयांना मिळत आहे. तर मित्रांनो सांगा, जे 70 वर्षात झाले नाही ते मोदींनी 7 वर्षात केले की नाही?” दरम्यान आपने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.




