नवी दिल्ली – देशात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किंमतीतील ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात सर्वसामान्य महागाईने बेजार झाला असाताना आता खिशावरचा भार आणखी वाढला आहे.
सीएनजीच्या किंमती 2 रुपयांनी वाढल्या असल्याने मुंबईत सीएनजीचे दर हे 76.00 रुपयांवरून 78.00 रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे सीएनजीवरील वाहनधारकांना मोठी झळ बसली आहे. मागील काही दिवसांपासून इंधनापासून ते सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.
मुंबई पेट्रोलचा दर 120 रुपये लीटर आहे. तसेच डिझेलचा दर 105 रुपयांवर पोहोचले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या दरम्यान असून डिझेलनेही शंभरी पार केली आहे. त्यात आता सीएनजी आणखी दोन रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अधिकचा बोजा वाढला आहे. तसेच, घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात मोठी वाढ झाली आहे.