लोणावळा, दि. 10 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. मिसिंग लेन प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या सुमारे 500 ते 600 फूट खोल असलेल्या बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली.
मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात असून हा आशियातील सर्वात रुंद बोगदा असल्याचेही मुख्यमत्री शिंदे यांनी सांगितले.यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.