नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा साथीचा प्रादुर्भाव जगभर सुरू आहे. सर्व देशांमध्ये त्याची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूपासून मुक्त होण्यासाठी एकूण आठ लसींवर क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तसेच जगभरात 110 लसी विकसित होत आहेत.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते जगातील सर्व देश एकत्रितपणे संक्रमण संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहेत. अमेरिका, चीन आणि जर्मनी या प्राणघातक विषाणू संपवण्याच्या प्रक्रियेच्या विकासाचे नेतृत्व करीत आहेत. सद्य परिस्थितीत अमेरिका आणि चीनसह अनेक देशांनी लस तयार करण्याच्या तारखांची घोषणा केली आहे.
शनिवारी चीनचे आरोग्य अधिकारी झांग व्हेनहॉंग यांनी मार्च 2021 मध्ये कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी लस तयार केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील फॉक्स न्यूजच्या व्हर्च्युअल टाऊन हॉलमध्ये बोलताना वर्षाच्या अखेरीस लस शोधण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे जगातील इतरही अनेक देशांकडून दावा केला जात आहे की ही लस लवकरच तयार होईल.