घरासाठी हार्डवेअर निवडताय?

आपल्या घरासाठी योग्य प्रकारचे हार्डवेअर निवडणे हे एक कौशल्याचे काम आहे. कारण घराचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच घराला मजबुत देण्याचेही काम करते. घरातील हार्डवेअर वापरण्यासंदर्भात काही टिप्स इथे सांगता येतील.

हार्डवेअरची निवड करताना ते घराच्या आकाराशी सुंसंगत राहील, याची खबरदारी घ्यायला हवी. जसे की युरोपिय, मॉडर्न किंवा पारंपरिक कंटम्परेरी स्टाइल. बहुतांश आर्किटेक्‍चरल स्टाइलशी मेळ साधणारे हार्डवेअर बाजारात उपलब्ध आहेत. योग्य आकाराचे बॅकप्लेट निवडावे आणि ते दरवाजाच्या डिझाइनला अनुरूप असेल, याची खबरदारी घ्यावी. जर आपल्या घराच्या दरवाजावर नक्षीकाम किंवा पॅनल डिझाइन असेल तर अशावेळी त्याची काळजी घेणे महत्त्वाचे.

फर्निचर, हार्डवेअरचे साहित्य हे घराच्या डिझाइनशी मिळतेजुळते असावे. तसेच वातावरणानुसार असावे. आर्द्रता अधिक असणाऱ्या ठिकाणी लोखंडापासून तयार केलेले हार्डवेअरला गंज पकडू शकतो. स्टेनलेस स्टिलचा वापर केल्यास गंज लागण्याची भिती राहत नाहीत. मात्र समुद्रकिनाऱ्याजवळ घर असेल तर अशा ठिकाणी भिंतीवर किंवा फर्निचरवर डाग पडू लागतात. अशा ठिकाणी ब्रॉझपासून तयार केलेले हार्डवेअर सर्वाधिक उपयुक्त ठरतात. घरातील अन्य गोष्टींशी म्हणजेच फर्निचरशी मिळतेजुळते असणाऱ्या हार्डवेअर आणि फर्निचरची निवड करावी. डार्क फिनिश असलेल्या दरवाजावर चमकदार सिल्वर फिनिशचे हार्डवेअर अधिक उठावदार दिसते. दरवाजाच्या लोकेशननुसार हार्डवेअरची निवड करावी.

मुख्यत: दरवाज्यावर अशा प्रकारच्या हार्डवेअरची रचना करावी जेणेकरून घरात प्रवेश करणाऱ्यावर त्याचा प्रभाव पडेल. दुसरीकडे बाथरुमच्या दरवाजासाठी लहान आकाराचे व्यावहारिक हार्डवेअरची निवड करावी. घराच्या मजबुतीसाठी उच्च गुणवत्तेचे हार्डवेअर निवडावे. हार्डवेअर सुंदर असावेच तसेच ते टिकावू देखील असावे. योग्य पद्धतीने तयार केलेले हार्डवेअर घराला योग्य सेवा प्रदान करते. घराच्या लूकला आणि स्टाइलची मिळतेजुळते असणाऱ्या हार्डवेअरची निवड करावी. स्वयंपाकघर किंवा बाथचे हार्डवेअर सारखेच असावे, जेणेकरून त्यात विसंगती राहणार नाही. हार्डवेअरची रचना करताना प्रशिक्षित आणि अनुभवी सुतारकाम करणाऱ्या व्यक्‍तीची मदत घ्यावी. घराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी हार्डवेअरची योग्य रितीने रचना करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.