विकासातील असंतुलन धोकादायक – प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली – देश मागील काही वर्षांपासून दारिद्य्राचा सामना करत आहे. त्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे. देशातील 1 टक्‍का लोकांकडे देशातील 60 टक्‍के पैसा असून ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे समतोल विकास होईल, अशी धोरणे तयार करण्याची गरज असल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

एका पुरस्कार सोहळयात मुखर्जी बोलत होते. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करून समस्या सोडवू शकेल, अशाच नेत्याची येथूप पुढे भारताला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे मुखर्जी म्हणाले.

मुखर्जी म्हणाले, आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. सध्या मार्च 2019 चा भारताचा विकासदर 7.4 असून पुढील वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये हा विकासदर 7.6 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही मुखर्जी यांनी यावेळी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.