तिखट, चमचमीत आणि मसालेदार पदार्थ खायला खूप चवदार असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मसालेदार पदार्थ खाल्ल्याने एखाद्याच्या फासळ्या तुटू शकतात? होय, अलीकडेच चीनच्या शांघायमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेला मसालेदार अन्न खाणे खूप घातक ठरले आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या महिलेला तिखट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर उबळ येऊन खोकला सुरू झाला. हा खोकला इतका गंभीर होता की खोकताना तिच्या चक्क चार बरगड्या तुटल्या. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे वेदना जाणवू लागल्यावर महिलेला काही दिवसांनी हा प्रकार कळला.
त्या महिलेला खोकला आल्यावर तिला पहिल्यांदा काही विशेष वाटले नाही, पण काही दिवसांनी तिला श्वास घेण्यास आणि बोलण्यात त्रास होऊ लागला. अशा स्थितीत महिलेने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. काही दिवसांपूर्वी (Chinese woman fractures 4 ribs after eating spicy food) आलेल्या खोकल्याचा झटका असताना खोकताना तिच्या बरगड्यांना इजा झाल्याचे तपासात समोर आले आहे.
एका रिपोर्टनुसार, या महिलेचे नाव हुआंग असून ती चीनमधील शांघायमध्ये राहते. अलीकडेच मसालेदार अन्न खाताना हुआंगला तीव्र खोकला आला, त्यानंतर तिच्या छातीतून मोठा कर्कश आवाज आला. काही दिवसांनंतर, हुआंगला श्वास घेण्यास आणि बोलण्यात त्रास होऊ लागला. जेव्हा हुआंगला जास्त वेदना होऊ लागल्या, तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे सीटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी तिला सांगितले की तिच्या बरगड्या तुटल्या आहेत, ज्यामुळे तिला तीव्र वेदना होत आहेत. अशा स्थितीत तिला कमरेला महिनाभर पट्टी बांधावी लागली. तुटलेल्या बरगड्यांचे कारण म्हणजे हुआंगचे शरीराचे कमी वजन. म्हणजे ही महिला अतिशय सडपातळ आणि कमकुवत आहे.
5 फूट 6 इंच उंच असलेल्या हुआंगचे वजन फक्त 57 किलो आहे. अशा स्थितीत तिच्या अशक्त शरीरामुळे जोराचा खोकला आल्याने तिच्या बरगड्या तुटल्या. दुसरीकडे, अपघाताबाबत हुआंगचे म्हणणे आहे की, या दुखापतीतून सावरल्यानंतर ती तिचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.