मुलांचे मन आणि मेंदू अतिशय निरागस असते. ते जे पाहतात, समजतात ते शिकतात. त्यांची शिकण्याची प्रवृत्ती खूप वेगवान असते. अशा परिस्थितीत मुलांच्या मनावर त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावरही होतो. किशोरवयीन मुलामुलींच्या वर्तनात बदल वयानंतर सुरू होतात. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात किशोरवयीन मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातात किंवा त्यांच्या बालमनात गैरवर्तनाची सुरूवात होते.
जेव्हा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, तेव्हा ते गैरवर्तन करू लागतात. त्यांना राग येतो, ते खोटे बोलतात, चोरी करतात किंवा असभ्य भाषा वापरू लागतात. अशा स्थितीत मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काही पद्धती अवलंबण्याची गरज भासते. मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी युनिसेफने पालकांना काही सल्ले दिले आहेत. मुलांकडून त्यांचे कल्याण जाणून घेण्यासोबतच युनिसेफच्या ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.
1. शेअरिंगला प्रेरणा द्या
मुलांना एकत्र येण्याची संधी द्या. त्यांच्या दिवसाबद्दल विचारा आणि एखाद्या कार्यासाठी मदतीसाठी विचारा. यादरम्यान त्यांच्याशी संवाद साधा. मुलाला खात्री द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. तुम्हाला कसे वाटते ते त्यांना सांगा आणि त्यांच्याबद्दल विचार करा. मुलांबरोबर उत्साहवर्धक शब्द बोलून आपल्या भावना सामायिक करा.
2. मुलांच्या भावना समजून घ्या.
तुम्हाला त्यांचे विचार चुकीचे वाटत असले तरीही त्यांना काय वाटते ते मान्य करा. त्यांच्याशी अशाप्रकारे मोकळेपणाने बोला की तुम्ही त्यांना समजून घेत असल्याची मुलांना खात्री पटावी. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यांना धीराने समजावून सांगा. त्याच वेळी, जेव्हा ते काही करतात तेव्हा तुम्हाला आनंद वाटत असेल तर ते देखील त्यांना शेअर करा.
3. मदत करण्यासाठी वेळ काढा
नवीन दिनचर्या आणि संभाव्य दैनंदिन ध्येये सेट करण्यासाठी आपल्या किशोरवयीन मुलांसोबत काम करा. शाळेचे काम एकत्र करा आणि रात्रीच्या जेवणापूर्वी गृहपाठ पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा. किशोरावस्था म्हणजे स्वातंत्र्य. त्यामुळे किशोरवयीन मुलांना स्वत:साठी पुरेसा वेळ आणि जागा द्या. मुलांसाठी अशा काही उपक्रमांचा विचार करा, ज्यामुळे त्यांना हवे ते करण्याची संधी मिळेल. मुले निराश होत असतील तर त्यांच्याशी चर्चा करून समस्येवर तोडगा काढा.
4. विवादांचे निराकरण करा
मुलांची मते ऐका आणि थंड डोक्याने प्रश्न सोडवा. लक्षात ठेवा की ते तुमच्यासोबत तणावग्रस्त होऊ शकतात. तुम्हाला राग येत असेल तर त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलू नका. तिथून बाहेर पडा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला शांत करा. नंतर तुम्ही त्या विषयावर मुलाशी बोलू शकता.
5. बळाचा वापर टाळा.
मुलं स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत असतात. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या इच्छेबद्दल सहानुभूती दाखवा आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवू नका. मुलांशी प्रामाणिक आणि पारदर्शक राहा. तुम्ही त्यांना तुमची कमजोरी किंवा तणावाचे कारणही सांगू शकता. मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी भांडण, रागावणं किंवा बळाचा वापर करीत मारहाण करणं हे प्रकार चुकूनही करू नका. उलट तुम्ही कठीण परिस्थितीत त्याच्या सोबत असल्याचे सांगा.
6. नातेसंबंधांसाठी वेळ काढा.
तुम्ही तुमचे अनुभव आणि भावना मुलांसोबत शेअर करू शकता असे काहीतरी पर्याय शोधा. तणावाचा सामना करण्यास आणि ताण कमी करण्यास मदत करणाऱ्या गोष्टींसाठी थोडा वेळ काढा. व्यायाम, खेळ, मित्रांशी बोलणे इत्यादीद्वारे आपले विचार व्यक्त करा.