मुंबई – #MeToo या मोहिमेअंतर्गत देशातील अनेक महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. यामध्ये सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते यांच्यावर महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले. आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांची नावे #MeToo बरोबर जोडली गेली.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ला #MeToo आणि चित्रपटसृष्टी याबद्दल आपला अनुभव विचारला. यावर उत्तर देत ‘हा प्रश्न कायम कलाविश्वातील व्यक्तींनाच का विचारला जातो, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना का नाही’, असा प्रतिप्रश्न तिने विचारला.
‘#MeToo संदर्भातील प्रश्न केवळ कलाविश्वातील व्यक्तींनाच विचारले जातात. मला आठवत नाहीये की हा प्रश्न कधी एखाद्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला विचारण्यात आला आहे. लैंगिक शोषण फक्त चित्रपटसृष्टीतच होत नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतं. असं देखील दीपिका म्हणाली.