30 सेंटीमीटर लांब भाताचे रोप तयार करण्यात यश
बीजिंग : अवकाश तंत्रज्ञानात नेहमीच अनेक प्रयोग केले जातात आणि यामध्ये चीन नेहमीच आघाडीवर असतो. आता चीनने अंतराळातील शेती यशस्वी केली असून अवकाशात 30 सेंटीमीटर लांबीचे भाताचे रोप आणि काही भाज्या विकसित करण्यात चीनच्या संशोधकांना यश आले आहे.
चीनी अंतराळवीरांनी तांदळाच्या दाण्यांचा वापर करून अंतराळात हे भाताचे रोप तयार केले आहे. तसेच चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळामध्ये थेल क्रेस नावाची एक भाजीसुद्धा विकसित केली असून कोबी आणि फ्लॉवर या वर्गातील ती भाजी असल्याचे सांगण्यात येते.
चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सने याबाबतचा लेख प्रसिद्ध केला आहे. केवळ महिन्याभराच्या कालावधीत खेल थेल क्रेसच्या रोपाला अनेक पाने आल्याचे लक्षात आले आणि भाताची विविध लांबीची रोपे विकसित करण्यात आले आहेत.
इतरही अनेक भाज्या आणि कडधान्य विकसित करण्याचा चीनच्या संशोधकांचा प्रयत्न आहे. अवकाशात विकसित करण्यात आलेली ही सगळी रोपे डिसेंबर महिन्यामध्ये पृथ्वीवर आणण्यात येणार असून त्यानंतर त्यावर संशोधन करण्यात येणार आहे.
पृथ्वीवर विकसित करण्यात आलेल्या भाज्या आणि रोपे यांची तुलना अंतराळात विकसित करण्यात आलेल्या या रोपाबरोबर करण्यात येणार असून त्यामधून काही आश्चर्यकारक निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे.