बिजिंग : – चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या दिग्गज खेळाडूंनी साफ अपयशी कामगिरी केली. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी तसेच महिला दुहेरी या तीनही गटात अनुक्रमे एच एस प्रणॉय, लक्ष्य सेन, प्रियांशू राजवत यांचा एकेरीत; तर एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला यांचा पुरुषांच्या दुहेरीत आणि ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचा महिला दुहेरीत पराभव झाला.
प्रणॉयचा पहिल्याच फेरीत मलेशियाच्या एन.जी. योंगकडून 21-12, 13-21, 21-18 असा पराभव झाला. तर लक्ष्य सेनला डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसन याने 23-21, 16-21, 21-9 असे पराभूत केले. शेसार रुस्तावितो याने प्रियांशूवर 21-13, 26-24 अशी मात केली.
महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीला चेन किंग-जिया फॅन यांच्याकडून 21-18, 21-11 असा पराभव स्वीकारावा लागला. तर केईचिरो मातसुई-योशिनोरी तकेऊची या जोडीने एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला जोडीचा 23-21, 21-19 असा पराभव केला.