बीजिंग :– देशभरात झालेल्या व्यापक आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर चीनमधील कोविडविरोधी निर्बंध आज मागे घेण्यात आले. यामुळे चीनमदील वादग्रस्त “झिरो कोविड’ धोरण रद्द केले जाण्याची शक्यता वाढली आहे.
चीनमधील केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन उपाय योजना आज जाहीर केल्या. त्यामध्ये लॉकडाऊन संपूर्ण जिल्ह्याला लागू करण्याऐवजी केवळ अपार्टमेंट पुरते मर्यादित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
करोनाचे बाधित रुग्ण दररोज 30 हजारांच्या आसपास सापडत असताना अचानक निर्बंध शिथील केल्यामुळेही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. निर्बंध हटवल्यामुळे करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू शकतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या महिन्यापासून या निर्बंधांच्या विरोधात होऊ लागलेल्या आंदोलनामुळे सरकारने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनादरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणीही व्हायला लागली होती.
Indonesia : इंडोनेशियात पोलीस स्थानकामध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट; इस्लामी दहशतवादी मोटरसायकलवरून ….
करोनाचा ओमायक्रॉन विषाणू कमी घातक आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. करोना विरोधी लसीचे तिन्ही डोस घेणाऱ्या 60 वर्षांपुढील नागरिकांचे प्रमाण 68 टक्के इतकेच आहे.