मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन ‘कपिल शर्मा’ला पुत्ररत्न झाला आहे. स्वतः कपिलने ही गोड बातमी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली, असून पहाटे जन्म झाल्याचं सांगितलं आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये गिन्नीचा एक फोटो सोशलवर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत होती. पण यासंदर्भात कपिल शर्माने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. मात्र, आता या गोष्टीचा खुलासा झाला असून, अनेकांनी कपिल शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत.
Namaskaar 🙏 we are blessed with a Baby boy this early morning, by the grace of God Baby n Mother both r fine, thank you so much for all the love, blessings n prayers 🙏 love you all ❤️ginni n kapil 🤗 #gratitude 🙏
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) February 1, 2021
कपिल आपल्या ट्विट मध्ये म्हणतो कि, “नमस्कार.., आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रुपात मुलगा आला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल”. या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
दरम्यान, नुकतंच कपिलची पहिली लेक 10 डिसेंबर रोजी एक वर्षांची झाली असून आता शर्मा कुटुंबात आणखी एक नवा पाहुणा आला आहे. त्यामुळे सध्या कपिल चांगलाच खुश आहे. कपिल आणि गिन्नी डिसेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले होते.