‘अण्णा हजारे महाराष्ट्राचे हास्यास्पद व्यक्‍तिमत्त्व’

अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी “आंदोलन रद्दबाबत’ केली टिप्पणी

पुणे – आण्णा हजारे हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातील एक हस्यास्पद व्यक्तीमत्व अशी ओळख झाली आहे, अशी टीकात्मक  टिप्पणी अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.

राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त डॉ. मुणगेकर पुण्यात आले होते. त्यावेळी आण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्याबाबत पत्रकारांनी डॉ. मुणगेकर यांना विचारले असता, त्यांनी आण्णांबाबत वरील टिप्पणी केली. यावेळी समितीचे गोपाळ तिवारी, भोला वांजळे, सुर्यकांत मारणे आदी उपस्थित होते.

भ्रष्टाचाराच्या विरोधात 2011 मध्ये आण्णांनी जे आंदोलन केले होते. ते आंदोलन काही बाह्यशक्तींनी नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रभावीपणे त्यांच्याकडून करून घेतले होते. आता, ते स्पष्ट झाले आहे. आण्णा हजारे हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातील एक हस्यास्पद व्यक्तीमत्व अशी ओळख झाली आहे. त्यामुळे त्यावर मला आधिक बोलण्याची इच्छा नाही, असे नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.