मुंबई – राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधणार आहेत. लॉक डाऊनच्या तिसरा टप्पा संपण्यास आता अवघे १० दिवस उरले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या अद्यापही झपाट्याने वाढत आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधताना कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा संवाद आपण दैनिक प्रभातच्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहू शकता. मुख्यमंत्र्यांचे संबोधन लाईव्ह पाहण्यासाठी दैनिक प्रभातच्या फेसबुक पेजला भेट द्या.