मुंबई – महान अभिनेता आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांनी आज वयाच्या ९८ व्या वर्षी जगाला निरोप दिला आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होेते. बॉलिवूड तसेच राजकीय क्षेत्रातून दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 7, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक व्यक्त करताना म्हणाले की, ”भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही केला शोक व्यक्त
“दिलीपकुमार जी सिनेसृष्टीतील एक महान आख्यायिका म्हणून लक्षात राहतील. त्यांना अद्वितीय प्रतिभेचा आशीर्वाद मिळाला होता, त्यामुळेच अनेक पिढ्यांचे दर्शक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे निघून जाणे आपल्या सांस्कृतिक जगासाठी एक क्षती आहे. त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती संवेदना, श्रद्धांजली.”
हे ही वाचा
कारगिल युद्धात माजी पंतप्रधान वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत