मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे “नटसम्राट’ पद्मविभूषण, दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड गेले. ते 98 वर्षांचे होते. गेले दोन वर्ष त्यांची प्रकृती तोळामासा होती. मात्र लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. त्यांनी सकाळी साडे सात वाजता अखेरच श्वास घेतला. दरम्यान, दिलीप कुमार आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यात एक खास नाते होते.
दिलीप कुमारशी शाहरुख खानचे नाते खूपच वेगळे होते. दिलीप कुमारच्या घरात शाहरुख खानला मुलाचा दर्जा मिळाला आहे. दिलीप कुमार यांनी शाहरुख खानला स्वतःचा मुलगा मानले होते.
याचे कारण असे की शाहरुखचे वडील ताज मोहम्मद खान यांचा जन्म पेशावरमध्ये झाला होता. पेशावरच्या ज्या गल्लीत ते लहानाचे मोठे झाले त्याच गल्लीत दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर आहे. याच कारणामुळे दिलीप कुमार यांनी शाहरुख खानला आपला मुलगा मानले होते.
एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, स्वत: शाहरुख खानने या रस्त्यावर बरेच दिवस आणि रात्री घालवली आहेत. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानने वडिलांसोबत लहानपणाचा फोटो शेअर केला होता आणि पेशावरच्या आठवणी शेअर केल्या. या फोटोसह त्याने लिहिले आहे की, तो आपल्या तीन मुलांना आपल्या कुटुंबाच्या गावी घेऊन जायचा आहे.