पुणे – शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा निर्माण होणार प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. शहरात दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या वाहतुकीचा प्रश्न आणि त्याचबरोबर पुणेकरांच्या नागरी समस्या याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेतली जाणार आहे. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर शिवसेना ( शिंदेगट) पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
शहराच्या प्रश्नाबाबत आणि नागरिकांच्या समस्यांबाबत शहर शिवसेना ( शिंदेगट) पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तसेच शहरातील विविध प्रश्नाबाबत तातडीनं बैठक घेण्याची मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शहरातील समस्यांबाबत देण्यात आलेल्या निवेदनाला मुख्यमंत्री शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
यावेळी जिल्हा सह संपर्क प्रमुख अजय भोसले, शहर प्रमुख नाना भानगिरे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र विस्तारक किरण साळी यांच्या उपस्थितीत शहरातील विविध समस्यांबाबत लोहगाव विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हे निवेदन देण्यात आले आहे.