Babar Azam – न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय टी-२० तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने न्यूझीलंड संघाविरुद्ध नाबाद अर्धशतक ( ७९धावा ) झळकावले. बाबरच्या या खेळीच्या जोरावर सामन्यात पाकिस्तानने यजमानांना ६ गडी राखून धूळ चारली. बाबरने या सामन्यातील त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर काही खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहून ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझम ( Babar Azam ) तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. बाबरने ( Babar Azam ) क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटमध्ये १०व्यांदा नाबाद राहून ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर डेव्हिड वॉर्नरने ९ वेळा अशी कामगिरी केलेली आहे.
मात्र अशा प्रकारच्या कामगिरीच्या यादीत भारताचा विराट कोहली पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर तर जोस बटलर आणि रोहित शर्मा संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक नाबाद ५० पेक्षा अधिक धावा –
१९ – विराट कोहली ( Virat Kohli )
११ – मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizawan)
१० – बाबर आझम ( Babar Azam )
९ – डेव्हिड वॉर्नर ( David Warner )
८ – जॉस बटलर ( Jos Butler )
८ – रोहित शर्मा ( Rohit Sharma )
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने भारतासाठी २४ वेळा तर विराट कोहलीने २३ वेळा अशी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसाठी बाबर आझमने २० वेळा अशी कामगिरी केलेली आहे.