नवी दिल्ली – गुजरातमधील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील ३० ते ३५ टक्के छोटे व्यवसाय बंद पडले असून हा चीनमधून आयात केल्याजाणाऱ्या स्टीलचा दुष्परिणाम आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संबंधातीला एक मीडिया रिपोर्ट एक्सवर शेअर केला ज्यात इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजमणी कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की भारतीय स्टेनलेस स्टील उत्पादकांना स्वस्त चीनी आयातीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे, ज्यामुळे जवळजवळ 30-35 टक्के छोटे उद्योग बंद पडले आहेत. गुजरातमधील मध्यम आणि लघु उद्योगांनी गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबर दरम्यान या आयातीच्या विरोधात जोरदार आवाज उठवला होता.
रमेश म्हणाले, की, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील ८० टक्के एमएसएमई एकट्या गुजरातमध्ये आहेत. यापैकी ३५ टक्के व्यवसाय जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान बंद आहेत. इतर अनेकांना टिकाव धरता येत नाही. कारण चीनमधून स्टीलच्या आयातीचा मोठा पूर आला आहे.
चीन, ज्या देशाला पंतप्रधानांनी क्लीन चिट दिली आहे आणि त्यांच्याकडून जी स्वस्तातील आयात होत आहे त्याची आमच्या देशाला कसलीही चिंता नाही असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले, “या सर्वात त्रासदायक माहितीचा स्रोत इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ते खरोखरच अशा पद्धतीने जाहीरपणे बोलणारे सर्वात धाडसी व्यक्ती आहेत.