आळंदी – चऱ्होली खुर्द येथील विश्रांतवड परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक दुर्गादास इंगळे यांसह नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होऊन आरोग्य विभागाच्या सानप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी क्षयरोग निर्मूलनाची शपथ घेतली. तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते अंगणवाडीतील मुलांना गणवेश, वही, पेन्सिल, खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास घोलप, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे, इंटरनॅशनल स्कुलचे अशोक थोरवे माजी सरपंच काळुराम थोरवे, तुकाराम केवळ, धनंजय थोरवे, रफिक शेख, शिवाजी धुळगंड, ज्ञानेश्वर पगडे, बोरूडे महाराज, किरण मोटकर, अंगणवाडी सेविका मंदाकिनी कुंभार, बांधकाम व्यावसायिक चक्रनारायण, हबिब अन्सारी यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.