पुणे – महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र तसेच राजीव गांधी पंपिंग स्टेशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारी (दि. 13 जुलै) संपूर्ण शहरासह या दोन्ही जलकेंद्रांतून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी बंद ठेवले जाणार असल्याने महापालिकेकडून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून दि. 10 ते 17 जुलैपर्यंत दररोज पाणी देण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परीसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगरचा वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग स्टेशन – सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगरमधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर
नागरिकांसाठी महत्त्वाचे
महापालिकेकडून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा सुरूच असतो. या केंद्रातून सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा भागात सात विभागांचे नियोजन करून दररोज एका भागात पाणी बंद ठेवले जाते. मात्र, 13 जुलै रोजी वडगाव जलकेंद्रात दुरुस्ती करण्यात येणार असल्याने येत्या सोमवारपासून गुरुवारपर्यंत आणि शुक्रवार व शनिवारी या दिवशीही वडगाव जलकेंद्रातून सर्व भागाला नियमित पाणी दिले जाणार आहे. तर 17 जुलैनंतर पुन्हा पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी बंद असणार आहे.