पुणे – भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आज राज्यभर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
दरम्यान, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांकडून पिंपरी-चिंचवड शहरात पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेनंतर पाटील यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, सुषमा अंधारे यांना अपिल केले होते की, या नेत्यांनी आता तरी म्हणावे की ही घटना बरोबर नाही. तसेच घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला होता.
दरम्यान घटनेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पावर यांनी ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी काही वेळेत सदर ट्विट डिलिट केले आहे. “चंद्रकांत दादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतंच पण त्याला विरोध म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक ही निषेधार्ह आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा होणारा अपमान हा आजचा नाही तर पूर्वापार होत आला असून त्याला विरोध करणं ही आपली वैचारिक लढाई आहे. ती संवैधानिक मार्गानेच लढायला हवी.”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होतो. मात्र त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट करून त्यात बदल करून दुसरे ट्विट केले.
दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले, “चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे.”
चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 10, 2022