शाईफेकनंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले – “हिम्मत असेल तर नेत्यांनी…”

Updated On:

पुणे – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. यादरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. घटनेनंतर शाईफेक करणाऱ्यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, शाईफेक करणारे हे भाडेकरू गुंड होते. हिम्मत असेल तर नेत्यांनी समोर या. तसेच विरोधी पक्षांनी आता बोलावे की, राष्ट्रवादी, शिवसेने की, अशी झुंडशाही चालू देणार आहात का? अजित पवार यांना खुलं अपिल आहे की, घटनेची निंदा करा.. चंद्रकांत पाटील अशा घटनांना घाबरत नाही. उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांनी हे तरी म्हणावे की, ही घटना बरोबर नाही. या घटनेची चौकशी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस करतील मात्र या चौकशीत कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचे कारण नाही, असे मी फडणवीस यांना आवाहन करतो, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या महापुरूषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. शाईफेक करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

आणखी संबंधित बातम्या

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

2026-10-07 08:45:36

Pimpri-Chinchwad: चासकमानही हातातून जाणार? स्थानिकांचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

2026-09-30 08:21:32

Pune Graduate constituency Election 2026: पुणे पदवीधरच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा?

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

2026-09-30 07:58:49

Pimpri-Chinchwad : गणेशोत्‍सवात पीएमपी, मेट्रोची कोटीची उड्डाणे

Pimpri-Chinchwad : डीजे वाजवणाऱ्यांवर तब्बल ९१ गुन्हे दाखल; पिंपरी-चिंचवडमध्ये ८६ प्रकरणांत साहित्य जप्त

2026-09-27 11:08:41

Pimpri-Chinchwad : डीजे वाजवणाऱ्यांवर तब्बल ९१ गुन्हे दाखल; पिंपरी-चिंचवडमध्ये ८६ प्रकरणांत साहित्य जप्त