मुंबई -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात वादळी फलंदाजीने जवळपास प्रत्येक संघाला धडकी भरवणारा कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग याला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघात रिंकूच्या समावेशाचे संकेत मिळत आहेत.
रिंकूने आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात 14 सामन्यांत 474 धावा केल्या आहेत. त्यातही त्याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या साखळी लढतीत 5 चेंडूत 28 धावांची गरज असताना सलग पाच षटकार फटकावत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या याच आक्रमक खेळामुळे निवड समिती प्रभावीत झाली आहे.