गुरुनानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त देशभरात “प्रकाशपर्व’चा उत्साह

नवी दिल्ली – शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु, गुरुनानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त आज “प्रकाशपर्व’ साजरे केले जात आहे. प्रकाश पर्वानिमित्त पंजाबमधली अनेक शहरे रोषणाईने उजळून निघाली आहेत.

अमृतसरमधले सुवर्णमंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजले आहे. नगर-कीर्तने, लंगर यांसारखे अनेक कार्यक्रम आज दिवसभर होणार आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आज नांदेडमधल्या “हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराला’ भेट देणार असून, लंगरमधे सहभागी होणार आहेत. याशिवाय 550 रोपट्यांची लागवड करण्याचा कार्यक्रमही त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

गुरुनानक यांच्या जीवनावर आधारित, आयोजित प्रदर्शनाला ते भेट देणार आहेत.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रकाशपर्व सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त दुबईतल्या भारतीय उच्चायुक्तालयावर रोषणाई केली आहे. नेपाळमधेही विविध ठिकाणी आज भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

गुरुनानक देव यांचा जन्म 1469 मधे कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस प्रकाशपर्व म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक हे थोर तत्वज्ञ, समाजसुधारक, विचारवंत आणि कवी होते. पंजाबमधे कपुरथळा जिल्ह्यात सुलतानपूर लोधी इथे गुरु नानक यांनी 15 वर्ष वास्तव्य केले होते, आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)