सुदृढ आरोग्यासाठी आपण नियमितपणे पालेभाज्या आणि फळे यांचा आहारात समावेश करतो. प्रत्येक पालेभाजीचे काही विशेष फायदे आहेत. आज आपण याच फळभाज्यांपैकी असणाऱ्या टोमॅटोचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात काय फायदे आहेत टोमॅटोचे
टोमॅटोचे फायदे खालीलप्रमाणे –
1. डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक – डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी टोमॅटो लाभदायी आहे. टोमॅटोमध्ये अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांशी निगडीत समस्यांना दूर ठेवण्यात टोमॅटो आपल्याला मदत करतो. तसेच यामध्ये अॅंटीऑक्सीडन्टस भरपूर असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्या चांगले राहते.
2. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फाययदेशीर – आजकाल हृदयविकारच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. याला कारणीभूत आहे ती आपली बदलेली जीवनशैली, ज्यामुळे या आजारांचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटोमध्ये लाईकोपीनचा समावेश असल्यामुळे हृदयाचे आरोग्या चांगले राहण्यास मदत मिळते. त्यामुळे हृदयविकाराच्या रू्ग्णांनी टोमॅटोचा आहारात जरूर समावेश करावा.
3. कॅन्सरपासून सुरक्षा – हाडांचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर इत्यादी कॅन्सरपासून टोमॅटो तुम्हाला सुरक्षित करते. लाईकोपीन या द्रव्यामुळे कॅन्सरच्या सेल्सना आळा बसतो. त्यामुळे कॅन्सरच्य रूग्णांनी टोमॅटोचे सेवन जरूर करावे.