वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
याप्रसंगी युवा वारियर चे हवेली तालुका अध्यक्ष अक्षय कुटे, विशाल कुटे, लौकिक शिवले, संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून वृक्षसंपदा वृद्धिंगत करावी असे आवाहन भाजप नेते गणेश कुटे यांनी यावेळी केले.