- घंटागाडी सुपूर्त : प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन
कार्ला – देवघर (ता. मावळ) येथे जवाहर ताराचंद कौल यांच्या स्मरणार्थ चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर ट्रस्ट (मुंबई) व उद्योजक अजय कौल यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर-वाकसई येथील इमारतीचे उद्घाटन आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषेद सदस्या कुसूमताई काशिकर, मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सरपंच दीपक काशिकर, उपसरपंच गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
तसेच ग्रामपंचयातीच्या वतीने गावातील घनकचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी देखील मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली.
देवघर-वाकसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली होती. मुलांना शिक्षण घेण्यात अडचण असाल्याने या मुलांसाठी कै. चिंधू सावळा भालेराव यांनी आपली जागा शाळेसाठी भेट दिली. तर त्या ठिकाणी ग्रामपंचयात देवघर, वाकसई यांच्या पुढाकाराने उद्योजक अजय कौल यांच्या मदतीने चार खोल्याबांधून शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी या शाळेचे भूमिपूजन करण्यात आले होते. आज ती इमारत पूर्ण झाल्याने मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. यावेळी देवघर-वाकसई माजी सरपंच भरत येवले, मावळ शिवसेना संघटक अंकुश देशमुख, मारुती देशमुख, किसन आहेर, माजी उपसरपंच मनोज जगताप, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, कैलास काशिकर, प्रदीप येवले, सदस्या पूनम येवले, उषा देशमुख, नीलम शेलार, अनिता रोकडे, पुष्पा देसाई, अनिता कारके, नगरसेविका प्रतीमा खोपडे, राजश्री पटेल, ग्रामसेवक डी. एस. जगताप, पोलीस पाटील अनंता शिंदे, बाळासाहेब येवले, सुरेश कडू, नवनाथ देशमुख, शंकर शिर्के, महेंद्र देशमुख, नवनाथ भालेराव, रवींद्र देशमुख, शंकर देशमुख, सूर्यकांत विकारी, मीरा केदारी, निवृती देशमुख, हनुमंत आहेर, शंकर ढाकोळ, गणेश देशमुख, शालिनी ढवळे, सुभाष भानुसघरे, दिलीप देशमुख, प्रवीण येवले, अमोल वायकर, भरत येवले, नंदू मोरे यांच्यासह देवघर ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुभाष भानुसघरे यांनी केले. बाळासाहेब येवले यांनी आभार मानले.